Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanTeam Lokshahi

अर्थसंकल्पात मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेसाठी केली 'ही' मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये गरिबांसाठी मोठ्या घोषणांचा पाऊस केला

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये गरिबांसाठी मोठ्या घोषणांचा पाऊस केला. केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेसाठी तिजोरी खुली केली. गरिबांनाही स्वतःचे घर असावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली. पंतप्रधान आवास योजनेचे बजेट ६६ टक्क्यांनी वाढवून ७९ हजार कोटी रुपये केले आहे.

Nirmala Sitharaman
मध्यमवर्गीयांना मोदी सरकारची मोठी घोषणा, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न आता करमुक्त

मोदी सरकारने गरिबांसाठी अंत्योदय योजनेबाबतही मोठी घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार 2 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. अर्थमंत्री म्हणाले, 'आमचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी सुलभ करणे, वाढ आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि व्यापक आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रित आहे.

अर्थमंत्री आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाले, 'पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपये केले जाईल. त्याच वेळी, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. याशिवाय शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शेतीशी संबंधित स्टार्ट अप्सना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. तरुण उद्योजकांना कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंडाची स्थापना केली जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com