'इंडिया' आघाडीची आज दिल्लीत महारॅली; अनेक विरोधी नेते होणार सामिल

'इंडिया' आघाडीची आज दिल्लीत महारॅली; अनेक विरोधी नेते होणार सामिल

'इंडिया' आघाडीतर्फे आज दिल्लीत 'सेव्ह डेमोक्रेसी रॅली' काढण्यात येणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

'इंडिया' आघाडीतर्फे आज दिल्लीत 'सेव्ह डेमोक्रेसी रॅली' काढण्यात येणार आहे. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर INDIA आघाडीतर्फे ही रॅली होत आहे. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने 30 मार्च रोजी आयकर नोटीसबाबत भाजपला कोंडीत पकडले. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला काँग्रेसला कमकुवत करायचे आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. या रॅलीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसेच यात 26 पक्षांचे नेते सहभागी होऊ शकतात.

लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांची ही पहिलीच मोठी रॅली असेल. शनिवारी आप नेते गोपाल राय आणि दिलीप पांडे यांनी रामलीला मैदानावरील तयारीची पाहणी केली. मोदी सरकारच्या या दडपशाही आणि हुकूमशाहीविरोधात उद्या इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानात सकाळी 10 वाजता महारॅली आयोजित केली आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांची भक्कम एकजूट दिसणार आहे. दारोदारी जाऊन दिल्लीकरांना रामलीला मैदानात एकवटण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी आज दिल्लीत वार्ताहरांना याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, आपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी दावा केला की, काँग्रेस नेत्या सोनिया गांधीही या रॅलीला उपस्थित राहणार आहेत. तर पंजाबमधून एक लाखाहून अधिक लोक सहभागी होतील अशी आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर काढण्यात येणाऱ्या 'लोकशाही वाचवा रॅली' चा उद्देश कोणत्याही व्यक्तीचे रक्षण करणे नसून संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण करणे आहे. या रॅलीच्या माध्यमातून लोककल्याण मार्गावर मजबूत संदेश जाईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com