राजकारण
India Alliance : इंडिया आघाडी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता
देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत आले आहेत.
देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत आले आहेत. ग्रँड हयातमध्ये या सर्वांची बैठक पार पडली. 28 पक्षांचे नेते या बैठकीसाठी मुंबईत जमले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडी लोगोची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
आज या बैठकीत जागावाटप, किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. दुपारी 3.30 वाजता इंडिया आघाडीतील नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ममता बॅनर्जी, आरजेडीचे नेते लालू यादव आणि त्यांचा मुलगा तेसस्वी यादव, अखिलेश यादव हे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत.