राजकारण
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल; पाहा मेन्यू
आज देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील ग्रँड हयातमध्ये दाखल होतील.
आज देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील ग्रँड हयातमध्ये दाखल होतील.आज आणि उद्या देशभरातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील 'ग्रॅण्ड हयात' या पंचतारांकित हॉटेलामध्ये होणार आहे.ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांकरता मराठमोळ्या पदार्थांचा खास बेत ठेवण्यात आला आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी हे मराठमोळ पदार्थ असणार आहेत.
बाकरवडी, नारळी वडी, नाचणीचे वेफर्स आणि वडापाव, चहा आणि कॉफींसह नारळपाणी, लिंबूपाणी, फळांचा ज्यूस. नारळाची करंजी, दुधी मावा आणि मोदक, श्रीखंड पुरी, भरलेले वांगे, झुणका भाकर, अशा अनेक मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते आहे.