राजकारण
'इंडिया'चे शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर
मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आणि आता 'इंडिया' आघाडीचे 20 खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर जाणार आहे
मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आणि आता 'इंडिया' आघाडीचे 20 खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर जाणार आहे. मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा सध्या देशभरात गाजतोय आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवरून प्रचंड गदारोळ झाला. संसदेत गदारोळानंतर विरोधकांच शिष्टमंडळ मणिपूरला जाणार असून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी जोरदारपणे लावून धरली आहे.