वेदांता प्रकल्पावर उदयोगमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, राजकारण करण्यापेक्षा...

वेदांता प्रकल्पावर उदयोगमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, राजकारण करण्यापेक्षा...

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणार यावरुन विरोधकांनी शिंदे सरकारला घेरले

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणार या बातमीनंतर विरोधकांनी आता शिंदे सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. यावर उदयोगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मागच्या पेक्षा आता गुजरातने अधिक इनसेटीव्ह दिलेला आहे. कंपनी गेल्यानंतर राजकारण करण्यापेक्षा ती आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सामंतांनी केले आहे.

उदय सामंत म्हणाले की, वेदांता आणि त्यासोबत असलेली कंपनीचा फोलोअप गेले अनेक दिवस सुरु होता. मी काही दिवसांपूर्वी या विभागाचा मंत्री झालो आहे. त्यामुळे या कंपन्या का दुसऱ्या राज्यात गेल्यात याची माहिती घेणार आहोत. त्यानंतर बोलण योग्य राहील. वेदांताचा फॉलोअप आता सुरु झालेला नाही. त्यांना मागच्या पेक्षा आता गुजरातने अधिक इनसेटीव्ह दिलेला आहे. कंपनी गेल्यानंतर राजकारण करण्यापेक्षा ती आणण्यासाठी प्रयत्न करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

माझं इतर कंपन्यांशी ही बोलणं सुरु आहे. विभाग लक्षात घेऊन कोणते उद्योग आणता येईल या संदर्भात माझं बोलणं सुरु आहे. त्यांच्या इतकं उद्योग आणण्यासाठी आमच सरकार सक्षम आहे, असेदेखील सामंतांनी सांगितले आहे.

रिफायनरी वादावर बोलताना उदय सामंत मी तिथे कुठे ही रिफायनरी करणार अस बोललो नव्हतो. तरी ही टीका करण्यात आली. सुरक्षा वाढवण्याच्या संदर्भात हे झाल अस नाना पटोले म्हणाले त्यांच्या विचारांची किव करावी वाटते, अशी टीकाही केली आहे. आता वेदांताची 1.56 लाख कोटींची गुंतवणूक गेल्याबद्दल गळे काढताना नाणार रिफायनरीच्या माध्यमातून होणार्‍या 3.5 लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीत तरी खोडा घालू नका', अशी विनंती सुद्धा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com