वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; शिंदे-फडणवीसांची मोठी घोषणा

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; शिंदे-फडणवीसांची मोठी घोषणा

विमा संरक्षणमुळे लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल-रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यात शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामुळे लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; शिंदे-फडणवीसांची मोठी घोषणा
आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीची धाड

यानुसार एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com