फक्त गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान मोदींना शोभत नाही; राज ठाकरेंचा टोला

फक्त गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान मोदींना शोभत नाही; राज ठाकरेंचा टोला

जागतिक मराठी संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोखठोक मुलाखत

पिंपरी : जागतिक मराठी संमेलनात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील एखादं दोन उद्योग बाहेर गेले तरी काही फरक पडत नाही. दर्या मे खसखस. पण, आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही. नुसतं एकसंघ म्हणायचं, असा जोरदार टोला राज ठाकरेंनी मोदी सरकारला लगावला आहे.

फक्त गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान मोदींना शोभत नाही; राज ठाकरेंचा टोला
...म्हणूनच हल्ली मी कमी बोलतो; राज ठाकरेंनी सांगितले कारण

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने अग्रेसर आहे. जे आहे ते जरी टिकवल तरी महाराष्ट्र पुढे आहे. एखादं दोन उद्योग बाहेर गेले तरी काही फरक पडत नाही. दर्या मे खसखस. पण, आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही. आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंजाबी होते मग त्यांनी काय फक्त पंजाबचे पाहावं का? उद्या आसामचा कोणीतरी होईल त्यांनी तसंच करायचं का? नुसतं एकसंघ म्हणायचं, असं असतं का एक संघ, असा निशाणा त्यांनी मोदी सरकारला साधला आहे.

जागतिक मराठी संमेलन भरवून काही होणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र मराठी संमेलन भरवा तरच तरुणांचे प्रश्न मिटतील. राज्यात कोणकोणत्या नोकऱ्या आहेत, कुठं रोजगार आहे. हे तेंव्हाच कळेल, खरं तर हे राज्यकर्त्यांचं काम आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

फक्त गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान मोदींना शोभत नाही; राज ठाकरेंचा टोला
'जो हा अपमान सहन करताहेत, ते गां**ची अवलाद', संजय राऊत संतापले

राज्यकर्ता हा मोठ्या मनाचा असावा त्याचा व्यापारी नसावा. राजकारणात पैसे हे माध्यम आहे. पण मन जिंकायला लागतात तेव्हाच राजकारण होतं. नुसते पैसे वाटून होत नाही, तसं असतं तर मतदानाचा टक्का कमी झाला नसता. राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नसतात, विविध अंगांनी कामं करता येतात. तुमच्या कामाला राजकारणाची धार नसेल तो पर्यंत सामाजिक कार्य होऊ शकत नाही. प्रत्येक मूलभूत गरजांशी राजकारण जोडलेल आहे. मग तुम्ही राजकारणाला तुच्छ का मानत आहात, असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com