नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांचे वक्तव्य; मी वॉशरूमला....

नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांचे वक्तव्य; मी वॉशरूमला....

नाराजीनाट्यावर अजित पवारांचे पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण

नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते अजित पवार व्यासपीठावरुन निघून गेले. यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्वतः ब्रेक लावला आहे. मी व्यासपीठावरुन नाराज होऊन नाही तर वॉशरूमसाठी गेलो होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

अजित पवार म्हणाले, मी व्यासपीठावरुन नाराज होऊन नाही तर वॉशरूमसाठी गेलो होतो. वॉशरूमसाठी गेलो तरी मीडियामध्ये अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जातात, असे त्यांनी म्हंटले आहे. रविवारीही अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधत या नाराजीच्या चर्चा फेटाळल्या होत्या. राष्ट्रीय अधिवेशन असताना वेगवेगळ्या राज्यातील मान्यवर यांनाही आपले विचार मांडयाचे होते. मी नाराज नाही. हे राज्याचं नाही तर राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे भाषण केलं नाही, असे अजित पवार यांनी म्हंटले होते.

काय घडले होते?

शरद पवार बोलण्याला उभे राहण्यापुर्वी अमोल कोल्हे भाषण करतील, अशी घोषणा करण्यात आली. अमोल कोल्हेंनंतर जयंत पाटील भाषण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. याचवेळी कार्यकर्ते अजित दादांनी भाषण करावे, अशी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होणार असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. मात्र, अजित पवार उठून पाठीमागे गेले. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे हिंदीमधून गाणे लॉन्च करण्यात आले. युथ कॉंग्रेसचा झेंडा लॉन्च करण्यात आला. तरीही ते बोलले माही,

Lokshahi
www.lokshahi.com