'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत म्हणून घोषित; महाराजांच्या जयंतीला शुभारंभ

'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत म्हणून घोषित; महाराजांच्या जयंतीला शुभारंभ

'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार केला आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय झाला.

मुंबई : 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार केला आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ हे गीत वाजविण्यास सुरुवात केली जाणार आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे.

'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत म्हणून घोषित; महाराजांच्या जयंतीला शुभारंभ
सत्यजित तांबे यांना भाजपची खुली ऑफर; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून मंत्रिमंडळात निर्णय घेतला आहे. राष्ट्रगीतानंतर यापुढे राज्यगीत हे म्हटलं जाणार आहे. विधान भवनातही वंदे मातरम् नंतर राज्यगीत हे म्हटले जावे, अशी विनंती आम्ही विधीमंडळाला करणार आहे, असे सुधीर मुनगंटीवारांनी म्हंटले आहे.

तसेच, महाराष्ट्र भूषण हा राज्याचा मोठा पुरस्कार आहे. मागील वर्षात त्याची निवड करता आली नाही. आतापर्यंत या पुरस्कारासाठी १० लाख दिले जात होते. मुख्यमंत्र्यांनी ती रक्कम २५ लाख केली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

एमपीएससी ही स्वायस्थ संस्था आहे. विद्यार्थ्यांचा असंतोष लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तो अभ्यासक्रम असावा असे शासनाकडून एमपीएससीकडे मागणी करण्यात येईल. विद्यार्थ्याचा विरोध हा अभ्यासक्रमाला नाही तर अभ्यासक्रमातील बदल हे केव्हापासून लागू करावे याबाबत आहे, असेही मुनगंटीवारांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, सध्या देशातील ११ राज्यांत स्वतःचे राज्य गीत वाजवले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गीत वाजवले जाईल. शाहीर साबळे यांनी गायलेले जय जय महाराष्ट्र या गीताची निवड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे. २०१५ मध्ये शाहीर साबळे यांचे निधन झाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com