तुम्ही सर्वांचे राजीनामे घ्या आणि...; निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटलांना अश्रू अनावर

तुम्ही सर्वांचे राजीनामे घ्या आणि...; निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटलांना अश्रू अनावर

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे राष्ट्रवादीचे सर्वच नेते व कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची साकडे घातले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकामध्ये अनेक राजकीय गौप्यस्फोट केले गेले आहे. यावेळी भाषणादरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे राष्ट्रवादीचे सर्वच नेते व कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची साकडे घातले आहे. यावेळी शरद पवारांनी गळ घालताना जयंत पाटील यांनी रडू कोसळले.

तुम्ही सर्वांचे राजीनामे घ्या आणि...; निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटलांना अश्रू अनावर
राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरवण्याचा निर्णय शरद पवारांनी सोपवला 'या' नेत्यांच्या खांद्यावर

काय म्हणाले जयंत पाटील?

शरद पवारांच्या नावाने आतापर्यंत मत मागतं होते. पक्षाला मतं शरद पवारांमुळे मिळातात. तेच जर बाजूला गेले तर आम्ही कोणाला घेऊन लोकांसमोर जायचं हा आमचा पहिला प्रश्न आहे. शरद पवारांनी प्रमुखपदी राहणं हे देशातील राजकारणासाठी तसेच लोकांसाठी गरजेचं आहे.

राष्ट्रवादी हा पक्षच शरद पवार यांच्यामुळे ओळखला जातो. असं अचानाक बाजूला जाण्याचा हक्क पवार साहेबांना नाही. असा निर्णय घेणे आम्हाला आणि देशातील कोणत्याही माणसाला मान्य होणार नाही. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना अजूनही पाहिजे आहे. आजही त्यांची स्फूर्ती-प्रेरणा घेऊन आम्ही राजकारणात वावरतो. अलीकडच्या काळात भाकरी फिरवण्याची भाषा केली होती.

शरद पवार यांची देशाच्या सर्वोच्च ठिकाणी प्रतिमा कोणालाही दुसऱ्याला येणार नाही. तुम्ही सर्वांचे राजीनामे घ्या आणि पक्ष नव्या लोकांच्या हातात द्यायचा तो द्या. पण, पक्षाच्या प्रमुख पदावरुन बाजूला जाणे हे हिताचे नाही. आम्हाला आपल्या छायेखाली काम करण्याची सवय झालीये. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सर्व थांबतो. हा पक्ष ज्यांना चालवायचा आहे, त्यांना चालवू द्या, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे. यावेळी जयंत पाटील यांनी अश्रू अनावर झाले.

दरम्यान, शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताना मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही, असे म्हंटले होते. जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न यांच्या सोडवणूकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा धास आहे. त्यामुळे आपणापासून कोणतीही फारकत नाही. मी आपणासोबत होतो, आहे व शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहणार., असेही शरद पवारांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com