शिंदे गटाचे काही खासदार भाजपाच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक; जयंत पाटलांचा मोठा दावा

शिंदे गटाचे काही खासदार भाजपाच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक; जयंत पाटलांचा मोठा दावा

भाजप शिंदे गटाच्या मतदारसंघात घुसखोरी करताना दिसून येत आहे. यामुळे शिंदे गट व भाजप युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात आहे.

मुंबई : शिंदे गट आणि भाजपने युतीमध्ये निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. परंतु, भाजप शिंदे गटाच्या मतदारसंघात घुसखोरी करताना दिसून येत आहे. शिंदे गटाच्या मतदारसंघात भाजपने संयोजक नेमले असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिंदे गट व भाजप युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे

शिंदे गटाचे काही खासदार भाजपाच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक; जयंत पाटलांचा मोठा दावा
फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया; आम्ही स्पष्टपणे त्यांना...

भाजप आणि शिंदे गटाचा अंतर्गत प्रश्न असल्याने त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. मात्र, शिंदे गटाचे बरेच खासदार शिंदे गटाच्या तिकीटावर उभे राहू इच्छीत नाही. त्यांतील बऱ्याच लोकांना भाजपच्या तिकीटावर उभे राहण्याची इच्छा आहे. आणि त्यामुळे शिंदे गटाची पंचाईत झाली आहे. यामुळे राज्यातील शिंदेबरोबर गेलेला शिवसैनिक पुन्हा मोठ्या संख्येने उध्दव ठाकरेंकडे परत येतील, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेणे सुरु आहे. उद्याही उरलेल्या जागा संदर्भात बैठक पार पडणार आहे. ठाकरे गटाने लढवलेल्या जागांची संख्या संजय राऊत सांगत आहेत. परंतु, आमची चर्चा झाली नाही. मविआची पुढील बैठक लवकर होईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांनी आता त्यांची पदकं गंगेत सोडणार आहेत. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, देशाच्या इतिहासात चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूला खाली पाडल जात हे निषेधार्थ आहे. देशातले सर्व क्षेत्रातले खेळाडू आज निषेध व्यक्त करत आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com