फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया; आम्ही स्पष्टपणे त्यांना...

फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया; आम्ही स्पष्टपणे त्यांना...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावरुन महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-मनसेच्या युतीची चर्चांना उधाण आले होते. यावर आता शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा आणि शिवसेना महायुती साठी कोणी येत असेल तर स्वागत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया; आम्ही स्पष्टपणे त्यांना...
नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 12 हजार मिळणार; फडणवीसांची घोषणा

शंभूराज देसाई म्हणाले की, आज आम्ही सुद्धा कॅबिनेट बैठकीमध्ये विचारलं. फडणवीस म्हणाले की, मला सुद्धा वेळ होता. बऱ्याच दिवसांपासून गप्पा मारायच्या होत्या. सहज गप्पा मारायला गेलो होतो. वेळ होता म्हणून गेलो होतो, असं मला तरी म्हणाले. बाकी ते त्यांनाच विचारा. मला काही माहित नाही.

आम्ही तर स्पष्टपणे अनेक वेळा विचारले आहे. पण, जर कोणी नवीन मित्र आलेच. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोणी सोबत येत असेल. कोणाला वाटत असेल की हिंदुत्वासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना मदत करावी. तर त्यांचे स्वागतच आहे. भाजपा आणि शिवसेना महायुती साठी कोणी येत असेल तर स्वागत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने संयोजक नेमले आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षाची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाने जरी पक्षाचा संयोजक असला किंवा युतीसाठी संयोजक नेमला असेल. भाजपा आणि शिवसेनेच्या युतीसाठी समन्वय साधण्यासाठी संयोजक नेमला असेल तर ते चांगलंच आहे. महायुतीसाठी ते चांगलंच आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेचा वर्धापन दिन नेहमीच आपण मोठ्या उत्साहाने जिल्ह्या-जिल्ह्यात साजरा करत असतो. त्याचप्रमाणे यावर्षीही शिवसेनेचा वर्धपान दिन १९ तारखेला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून वेगवेगळे उपक्रम राबवत संपूर्ण राज्यात साजरा करणार आहोत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com