उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही...: शंभूराज देसाई

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही...: शंभूराज देसाई

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

प्रशांत जगताप | सातारा : उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्हाला वेगळी भूमिका घेता आली असती. ठाकरेंनी स्वेच्छेने पदाचा त्याग केला म्हणून नवीन सरकार आले, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर परिस्थिती पूर्ववत करता आली असती, असे महत्वपूर्ण विधान न्यायालयाने निकालादरम्यान केले आहे.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही...: शंभूराज देसाई
सरकार स्थिर, मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान

16 आमदार निलंबनाचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. हे सरकार कोसळणार ही गोष्ट विरोधक सतत सांगत होते. ते किती चुकीचे होते. आजच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. सर्वांना समान संधी देण्याचे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं. निकालाबाबत ठाकरे गटाने आणि उपाध्यक्ष झिरवळ यांनी आताताई पणा केला. निकालाचे आम्ही स्वागत केलं असून या सरकारला कोणताही धोका नाही, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे..

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्हाला वेगळी भूमिका घेता आली असती. ठाकरेंनी स्वेच्छेने पदाचा त्याग केला म्हणून नवीन सरकार आले. आमचे सरकार कायदेशीर असून आमच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.

निकाल स्पष्ट आला तरी संजय राऊत यांना म्हणायची सवय आहे. राऊत काय म्हणतात याकडे आम्ही लक्ष देत नाही, राऊत यांना बोलत राहूदे निकालाबाबत आम्ही समाधानी आहे. तर, भरत गोगावले यांच्याबाबत कोर्टाने निरीक्षण नोंदवले आहे. पक्ष कोणाचा हा वादाचा विषय असल्याने आम्ही भरत गोगावले यांची नियुक्ती केली. 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांचा आहे. आम्ही सर्व पुस्तिका अध्यक्षांसामोर मांडू. आमची बाजू सत्याची न्यायाची आणि बहुमताची असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com