अजित पवार यांच्यानंतर जयंत पाटलांना डेंग्यूची लागण

अजित पवार यांच्यानंतर जयंत पाटलांना डेंग्यूची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती.
Published by  :
Siddhi Naringrekar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना डेग्यूची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. जयंत पाटील यांची तपासणी केल्यानंतर आज आलेल्या रिपोर्टमधून डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

जयंत पाटील यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन. असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com