जयंत पाटलांचा लवकरच भाजपात प्रवेश  ? भाजपा खासदार संजयकाका पाटील यांचे सूचक वक्तव्य

जयंत पाटलांचा लवकरच भाजपात प्रवेश ? भाजपा खासदार संजयकाका पाटील यांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात येतील,असे संकेत सांगलीचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी दिले आहेत.
Published on

संजय देसाई, सांगली

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात येतील,असे संकेत सांगलीचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी दिले आहेत. भाजपाच्या होकायंत्रांचा इशारा असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, अशी दिशा धरुया,अश्या शब्दात खासदार संजयकाका पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजितदादांच्या गटात दाखल झालेले आहेत.अशा परिस्थितीमध्ये जयंती पाटील कुठे जाणार ? चर्चा सुरू आहेत,यावरून भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील आता कुठे जाणार ?असा प्रश्न उपस्थित करताना जयंत पाटील यांचा भाजपा प्रवेश होईल, असे संकेत दिले आहेत. सांगलीच्या मिरजेमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते, यावेळी भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com