अजित पवार आणि तुमच्यात वाद आहेत का? जयंत पाटील म्हणाले...

अजित पवार आणि तुमच्यात वाद आहेत का? जयंत पाटील म्हणाले...

कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला
Published by :
Siddhi Naringrekar

कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुमच्यात आणि अजित पवार यांच्यात वाद आहेत का? यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात शरद पवार यांच्या सभा होत असताना त्याविषयी काही लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्यात कधीच वाद नव्हते तुम्हाला ते कुठेतरी दिसले का? उगाच कुठलाही मुलामा देऊ नका. अजित पवार आणि मी आमच्यात कधीही वाद नव्हते. आम्ही शरद पवार यांचे कार्यकर्ते आहोत त्यांच्याबरोबर राहिलो आहोत. इतकंच आहे. असे जयंत पाटील म्हटले.

तसेच ते पुढे म्हणाले की, कोल्हापुरातल्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकात शरद पवार यांनी सभा घेतली पाहिजे असा आग्रह केला त्यामुळे आम्ही २५ तारखेला या ठिकाणी सभा घेणार आहोत.महाराष्ट्रात जात असताना काही लोक गैरसमज पसरवत आहेत. ५ सप्टेंबरला जळगावलाही सभा घेतली जाणार आहे. असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com