Jayant Patil : एकनाथ शिंदेंनी एक्का काढला आणि आमचा पत्त्यांचा डाव कोसळला
संजय देसाई, सांगली
सांगलीतील कसबे डिग्रज गावामध्ये अद्यावत रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस होता. सर्व तयारी झाली होती मात्र, एकनाथ शिंदे यांनी एक्का काढला आणि आम्ही मांडलेला पत्त्यांचा डाव कोसळला असे विधान जयंत पाटील यांनी केलेले आहे. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय व आष्टा ग्रामीण रुग्णालयास 2 कोटी 25 लाख रुपये किंमतीच्या डायलिसिस मशीन व वैद्यकीय उपकरणे प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, आरोग्याच्या सुविधांबाबत आम्ही कधीच शहाणे आणि सजग नव्हतो. कोरोना आल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या सुविधांचे महत्त्व कळले. काही दवाखान्यात आत गेलेली माणसं कमी बाहेर आली. या काळात असेही हॉस्पिटल होते की एखादा श्रीमंत माणूस आला की याचा ऑक्सिजन काढून त्या श्रीमंत व्यक्तीला लावायचा. असे उद्योग वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये झालेले. असे जयंत पाटील म्हणाले.