राष्ट्रवादीत नाराजीच्या चर्चां, जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले...

राष्ट्रवादीत नाराजीच्या चर्चां, जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले...

शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर महत्वाची बैठक सुरु असल्याची माहिती मिळत होती. परंतु, या बैठकीचे निमंत्रण मला नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले होते.

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात एकच खळबळ माजली आहे. याबाबत शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर महत्वाची बैठक सुरु असल्याची माहिती मिळत होती. परंतु, या बैठकीचे निमंत्रण मला नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले होते. यावरुन जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राष्ट्रवादीत नाराजीच्या चर्चां, जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले...
सिल्व्हर ओकवरील बैठकीला निमंत्रण नव्हतं; जयंत पाटील नाराज?

माझी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांनी सांगितलं की अशी कोणतीही बैठक झालेली नाही. संध्याकाळी 5 वाजता बैठक असून त्याला येण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

तर, महाविकास आघाडीच्या सभा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, उन्हाळ्यात सभा घेणे थोडं अवघड होणार आहे. यामुळे तारखा बदलण्याचा निर्णय 1 तारखेच्या सभेत अनौपचारीक चर्चेत झाला होता. सभा रद्द झालेल्या नाहीत, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, जे पदचं अस्तित्वात नाही. त्याचा राजीनामा कसं देऊ शकतात, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या टीकेचाही जयंत पाटील यांनी समाचार घेतला आहे. मुनगंटीवारांचा वारंवार तोल का जातो हेच कळतं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्निकल गोष्टी उपस्थित करुन राजकारण होत नसतं. राजकारण लोकांच्या समाजाच्या मनावर आणि मानण्यावर असते. त्यांची विधाने चार दिवस बघत आहे त्या विधानांमध्ये राष्ट्रवादीबदद्ल प्रचंड तिरस्कार दिसत आहे. ते चुकीची विधानं करत आहेत. ते राज्याचे जबाबदर मंत्री आहेत, असेही जयंत पाटलांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com