सिल्व्हर ओकवरील बैठकीला निमंत्रण नव्हतं; जयंत पाटील नाराज?

सिल्व्हर ओकवरील बैठकीला निमंत्रण नव्हतं; जयंत पाटील नाराज?

शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर महत्वाची बैठक सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात एकच खळबळ माजली आहे. तर, कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी शरद पवारांकडे मागणी करत आहे. अशात, शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर महत्वाची बैठक सुरु असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलच गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सिल्व्हर ओकवरील बैठकीला निमंत्रण नव्हतं; जयंत पाटील नाराज?
कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष? सुप्रिया सुळेंच्या नावाची जोरदार चर्चा

शरद पवार यांनी राजीनामा देणं योग्य वाटलं नाही आणि त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, असे सर्व कार्यकर्त्यांचे मत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांनी राजीनामा देणे योग्य नाही, असं फोन करुन सांगितलं आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

तर, सिल्व्हर ओकच्या बैठकीचे मला माहित नव्हते. याची मला कोणीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. आज माझी आयुक्तालयात बैठक ठरलेली होती. यानुसार पुण्यात आलो आहे. ही बैठक झाल्यावर मी परत जाणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्ष पदासाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा आहे. याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, मला माहिती नाही काय चर्चा झाली. माझ्यासमोर कोणतीही चर्चा झालेली नाही. मला काहीच कल्पना नाही. मी काही राष्ट्रीय पातळीवरचा कार्यकर्ता नाही. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय स्तरावर आमच्या पक्षात कोणती प्रोव्हिजन आहे हे मला माहित नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, शरद पवारांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीतील कार्यकर्ते नाराज झाले असून राजीनामा सत्र सुरु झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर, जयंत पाटील यांनाही राजीनामा दिल्याची चर्चा होती. परंतु, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपल्या कोणत्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा जयंत पाटलांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com