राजकारण
Jayant Patil : व्हीप पाळला नाही तर ...; - जयंत पाटील
राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत.
राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील म्हणाले की,राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४४ आमदारांना व्हीप लागू शपथ घेतलेल्या ९ आमदारांना व्हीप लागू नाही. शपथ घेतलेल्या 9 आमदारांना व्हिप लागू पडत नाही. व्हिप न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार असे जयंत पाटील म्हणाले. आजच्या या बैठकीला कोणते आमदार उपस्थित राहतात हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.