Jitendra Awhad
Jitendra AwhadTeam Lokshahi

आव्हाडांना आजच न्यायालयात हजर करण्याची शक्यता

त्यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह 12 कार्यकर्त्यांना अटक केली असल्याचंही वृत्त आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह 11 कार्यकर्त्यांना अटक केली असल्याचंही वृत्त आहे.

Jitendra Awhad
Pratapgadh Afzal Khan Tomb : अफजल खानाच्या कबरीबाबत या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

दरम्यान, या प्रकरणात आज सायंकाळी 5 वाजता जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आज न्यायलयात काय होणार याकडे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांचंही लक्ष असणार आहे.

वर्तकनगर पोलिस स्टेशनबाहेर राष्टरवादीचे कार्यकर्ते:

आव्हाडांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वर्तकनगर पोलिस चौकीबाहेर राष्ट्रवादीचे महिला व पुरूष कार्यकर्ते आक्रमक झाले असुन पोलिस चौकीबाहेर जमिनीवर बसून कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरूवात केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com