राजकारण
हवं तर मी राजकारण सोडतो पण...; जितेंद्र आव्हाड
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेत प्रतिक्रिया येत आहेत. यातच आज शरद पवारांची येवल्यात सभा होणार आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांना भावनिक साद घातली आहे. जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित दादांनी परत यावं, हवं तर मी राजकारण सोडतो. अजितदादांसह सर्वजण परत येण्यासाठी मी राजकारण सोडायला तयार आहे. तुम्ही आमच्यावर टीका करताय तर मी जयंत पाटील यांनासुद्धासोबत घेऊन जाईन. तुम्ही साहेबांना त्रास देऊ नका. असे आव्हाड म्हणाले.