Jitendra Awhad : बरे झाले साहेबांविषयी यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे

Jitendra Awhad : बरे झाले साहेबांविषयी यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे

दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे.आपल्याकडं शरद पवारांसारखे नेते आहेत. मात्र शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपले फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते.जनतेनं एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात.शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही.

याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आव्हाड म्हणाले की, हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही याचं आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार निवडून आणू शकले नाही. अन् शरद पवारांबद्दल बोलत आहेत.

तसेच वळसे पाटील जे काही बोलले,त्याबद्दल काही वाईट वाटत नाही...पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही आंबेगाव धडा शिकवेल. असे आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad : बरे झाले साहेबांविषयी यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे
Dilip Walse Patil: जनतेनं एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com