शेतकरी आत्महत्या करतोयं आणि पंतप्रधान आफ्रिकेचा चित्ता दाखवताहेत; के.सी. रावांचे टीकास्त्र
छत्रपती संभाजीनगर : देशात लोकशाही असेल तर शेतकऱ्यांना का 15 दिवस आंदोलन करावं लागलं. रोज 5 ते 7 शेतकरी आत्महत्या करीत आहेत. इकडे शेतकरी मरत आहे आणि पंतप्रधान आफ्रिकेचा चित्ता दाखवत आहेत, असे जोरदार टीकास्त्र तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर डागले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बीआरएसची आज भव्य सभा झाली आहे. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गुलाबी फडकवा मग तुमच्या मागे दिल्लीतील नेते येतील, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
महाराष्ट्र हा सर्वात जास्त नद्यांच राज्य आहे. मात्र सरकार पिण्याचं पाणी देत नाही. जनता सोन्याच्या विटा, चंद्र, तारे मागत नाहीत तर पिण्याचे पाणी मागत आहे. बेरोजगारी वाढली आहे. लाखो कंपन्या बंद पडला आहे. तर जातीवाद आणि लिंगवाद केला जातोय. श्रीमंत श्रीमंत होत आहेत आणि गरीब हे गरीब होत आहेत, हे असंच सुरू राहायला हवे की याचा इलाज व्हायला हवा? आपल्याला आपले ठीक करावं लागेल, विदेशातील लोक येणार नाहीत, असे के चंद्रशेखर राव यांनी म्हंटले आहे.
देशात लोकशाही असेल तर शेतकऱ्यांना का 15 दिवस आंदोलन करावं लागलं. 750 लोकांना मरावं लागत आणि आपण याला लोकतंत्र म्हणतो. रोज 5 ते 7 शेतकरी आत्महत्या करीत आहेत. इकडे शेतकरी मरत असते तर पंतप्रधान आफ्रिकेचा चित्ता दाखवत आहेत. देशाला परिवर्तन हवे आहे. मात्र, देशाच्या पंतप्रधानांची इच्छाशक्ती नाही, मुख्यमंत्र्यांची आणि मंत्र्यांची इच्छाशक्ती नाही, हे सगळं देवाच्या भरोशावर सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
देशातील पाण्याची पॉलिसी बंद करायला हवी अथवा बदलायला हवी. पाण्याच्या बाबतीत आपला देश मागे आहे. महाराष्ट्रात बीआरएस सरकार आणा. मग प्रत्येक घरात नळ येईल. शेतकऱ्यांना लागेल तेवढे पाणी देऊ, असे के सी राव यांनी जाहीर केले आहे. तसेच, तामिळनाडूचे हाल आधी महाराष्ट्रापेक्षा बेकार होते. तामिळनाडू छोटे राज्य आणि महाराष्ट्रापेक्षा कमजोर राज्य आहे. मात्र, आता शेतकऱ्यांना मोफत 24 तास वीज मिळते, असेही ते म्हणाले.
मोदी म्हणतात डिजिटल इंडिया तर कुठं गेला डिजिटल इंडिया. मेक इन इंडियाच्या आणि डिजिटल इंडियाच्या नावाने लोकांना वेड्यात काढले जाते. मेक इन इंडियात चायना काय करते, असाही निशाणा त्यांनी साधला आहे. तर, तुमचे तलाठी मुख्यमंत्र्यांपेक्षा पॉवरफुल आहेत. तलाठ्यांना महाराष्ट्रात ब्रम्हदेव मानले जाते. तलाठी मनाप्रमाणे निर्णय घेतला. परंतु, आम्ही तलाठ्याला आम्ही बरखास्त केले, असे त्यांनी म्हंटले आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षी एकराला दहा हजार रुपये देतो. त्यासाठी त्या शेतकऱ्यांना कुठे जावं लागत नाही. दलाल नाही. थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यासाठी 7 हजार केंद्र आहेत. मध्ये कोठेही दलाल नाहीत. महाराष्ट्रातही धनाची कमी नाही तर तणाची कमी आहे. तूप सरळ बोटाने निघत नसेल तर बोट वाकड करावं लागतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गुलाबी फडकवा मग तुमच्या मागे दिल्लीतील नेते येतील, असे आवाहन त्यांनी केसे आहे.