Mahua Moitra | TMC
Mahua Moitra | TMC team lokshahi

महुआ मोइत्रांचं आक्षेपार्ह वक्तव्य, मुख्यमंत्री संतापले

महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या

Mahua Moitra : मध्य प्रदेशात कालीदेवी वादात मुख्यमंत्री शिवराज सरकार यांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी भोपाळ गुन्हे शाखेने टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. खासदार मोइत्रा यांनी माँ कालीबद्दल वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. हिंदू देवतांचा अपमान कोणत्याही किंमतीत खपवून घेतला जाणार नाही. महुआ मोईत्राविरुद्ध आयपीसी कलम २९५अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (kaali controversy mahua moitra unfollows official tmc twitter handle)

Mahua Moitra | TMC
चेक स्वरुपात व्यवहार करत असाल तर ही बातमी वाचा, बँकांनी बदललेत नियम

काली या माहितीपटाच्या पोस्टरवरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. पोस्टरमध्ये माँ काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्या लीना मनिमेकलाई आणि इतरांविरुद्ध अनेक राज्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी याबाबत वादग्रस्त ट्विट केले होते. आरएसएसवरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या ट्विटनंतर भाजप खासदार महुआ यांच्यावरही सतत हल्लाबोल करत आहे. भाजपने हे लोकांना धार्मिक चिथावणी देणारे ट्विट असल्याचे म्हटले आहे.

Mahua Moitra | TMC
Buffalo Farming : शेतकरी होणार श्रीमंत 'या' जातीच्या म्हशींचे करा संगोपण

'कालीची अनेक रूपे'

महुआ मोईत्रा म्हणाल्या होत्या, तुला तुझा देव कसा दिसतो. भूतान आणि सिक्कीमला गेलात तर सकाळच्या पूजेत देवाला व्हिस्की अर्पण केली जाते, पण उत्तर प्रदेशातील एखाद्याला ही व्हिस्की दिली तर त्याच्या भावना दुखावू शकतात. माझ्यासाठी देवी काली मांसाहारी आणि मद्यपान करणाऱ्याच्या रूपात आहे. काली देवीची अनेक रूपे आहेत. अस वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com