हिमाचल प्रदेशच्या मंडी जागेवर कंगना रणौत 50 हजारांहून अधिक मतांनी पुढे

हिमाचल प्रदेशच्या मंडी जागेवर कंगना रणौत 50 हजारांहून अधिक मतांनी पुढे

2024 च्या लोकसभा निवडणुकीत मंडी जागेसाठीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले.
Published by :
Dhanshree Shintre

2024 च्या लोकसभा निवडणुकीत मंडी जागेसाठीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले. भाजप उमेदवार कंगना रणौत यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह हे उमेदवार आहेत. हिमाचल प्रदेश हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे गृहराज्य असल्याने सर्वांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. बॉलिवूडची 'पंगाक्वीन' अर्थात कंगना रनौत हिने भाजपकडून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. सध्या कंगना 54042 मतांनी पुढे आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये नेहमीच काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. आता या दोन्ही पक्षांतील दोन तरुण चेहरे यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरले. कंगना रनौत गेल्या एका दशकापासून बॉलिवूडमध्ये हिंदुत्वाचा प्रचार करताना दिसून आली. त्यामुळे 'पंगाक्वीन' अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. तर दुसरीकडे विक्रमादित्य सिंह हाडाचा राजकारणी आहे. तर दुसरीकडे विक्रमादित्य सिंह यांचे आई-वडील दोघेही हिमाचल प्रदेशातील राजकारणात सक्रीय आहेत.

मतमोजणीचे थेट अपडेट्स नुकतेच सुरू झाले आहेत. सध्या भाजपच्या उमेदवार कंगना राणौत आघाडीवर आहेत. ते 54042 मतांनी पुढे आहेत. काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सध्या सुरुवातीचे ट्रेंड आहेत. काही तासांतच परिस्थिती स्पष्ट होईल. मात्र, हिमाचलमधील सर्व जागांवर भाजपची सुरुवातीची आघाडी दिसत आहे.

मंडी कंगना रणौत भाजपा - 54042 मतांनी पुढे

कांगडा डॉ. राजीव भारद्वाज भाजपा - 204605 मतांनी पुढे

शिमला एसके कश्यप भाजपा - 70177 मतांनी पुढे

हमीरपूर अनुराग सिंह ठाकूर भाजपा - 130696 मतांनी पुढे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com