शरद पवार की अजित पवार, नवाब मलिक कोणाला देणार पाठिंबा? कप्तान मलिकांनी सांगितले

शरद पवार की अजित पवार, नवाब मलिक कोणाला देणार पाठिंबा? कप्तान मलिकांनी सांगितले

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात आला. यानंतर मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार की अजित पवार, नवाब मलिक कोणाला देणार पाठिंबा? कप्तान मलिकांनी सांगितले
Nawab Malik : मोठी बातमी; नवाब मलिक यांना जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जल्लोष केला जात आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर नवाब मलिक हे शरद पवार गटाला पाठिंबा देणार की अजित पवार यांच्या सोबत जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मात्र, आमच्यासाठी राजकारण नव्हे तर त्यांच्यावरील उपचार हे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांनी व्यक्त केली आहे. तसेच, ही बातमी समजताच कप्तान मलिक यांना अश्रू अनावर झाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com