Basavaraj  Bommai eknath shinde
Basavaraj Bommai eknath shindeTeam Lokshahi

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर...; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान

सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. यावरुन राज्यात वादंग पेटले असतानाच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महत्वाचे विधान समोर येत आहे

नंदकिशोर गावडे | मुंबई : सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. यावरुन राज्यात वादंग पेटले असतानाच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महत्वाचे विधान समोर येत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमा विवाद चर्चेने सोडवावा, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत पुढील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलाविणार असल्याचे बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

Basavaraj  Bommai eknath shinde
शरद पवार बोलले की उद्धव ठाकरेंना बोलावंच लागतं; फडणवीसांचा निशाणा

बोम्मई म्हणाले की, सर्वोच्च न्यायालायात केस दाखल केली आहे. आम्ही आमचे युक्तीवाद तयार केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्याबाबत मागील सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तीवाद करण्याचे आमचे एकच उद्दिष्ट आहे. तो सर्वपक्षीय बैठकीत वाटाघाटीतून सोडवला जाईल. दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हंटले आहे.

तर, संपूर्ण सीमाप्रश्न संपला आहे. गाव पंचायतींनी स्वतः कर्नाटकातील जत तालुक्यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवादाच्या सादरीकरणादरम्यान या सर्व गोष्टी समोर येतील, असा विश्वास सीएम बोम्मई यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याच्या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा ट्विट करत वाद निर्माण केला होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केलं असून, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नड भाषिक भाग आमच्या समाविष्ट केले पाहिजेत, असे त्यांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com