Kasba-Chinchwad Results
Kasba-Chinchwad Results

Pune Bypoll Results : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल काय लागणार?

Pune Bypoll Results : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडणार आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

पुणे : राज्यभरात बहुचर्चित ठरलेली कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि 26) मतदान झाले. आज गुरुवारी मतमोजणी होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Kasba-Chinchwad Results
All The Best! आजपासून दहावीची परीक्षा

कसबा निवडणूकीत कोण मारणार बाजी?

कसबा मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. कसब्यात या दोघांमध्ये सध्या चांगलीच चुरशीची लढत दिसत आहे. दोन्ही पक्षाकडून धुमधडाक्यात प्रचार झाला. दरम्यान, निकालाआधीच स्ट्रेलिमा या संस्थेने कसब्याचा एक्झिट पोल जाहीर केला आहे.

त्यात भाजपला धक्का बसेल असं सांगण्यात आलं आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com