Mukta Tilak | Congress
Mukta Tilak | CongressTeam Lokshahi

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, काँग्रेस लढणार : सुत्र

कसबा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास सामना रंगणार

पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड दोन जागा रिक्त झाल्या होत्या. परंतु, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

Mukta Tilak | Congress
कसबा पेठ, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. कोणत्याही आमदार वा खासदाराचे निधन झाल्यास विरोधकांकडून त्या जागेवर उमेवार उभा केला जात नाही. बिनविरोध निवडणूक पार पाडण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. परंतु, कसबा पेठ या जागेवरुन कॉंग्रस पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. परंपरागत हा मतदारसंघ काँग्रेसच लढवत आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असूनही या जागेवर काँग्रेस लढणार आहे. यानुसार काँग्रेसने तयारी सुरु केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे.

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर याच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी निवडणूक लढण्याची इच्छा जाहिर केली होती. परंतु, अजित पवार यांनी रुपाली पाटील यांचे कान टोचले होते. मात्र, काँग्रेस ही जागा सोडण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास सामना रंगणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून उमेदवार कोण असणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडीनंतर अखेर मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला होता. परंतु, आता कसबा पेठ निवडणूक कॉंग्रेस लढणार असल्याने सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com