आदित्य ठाकरेंना अटक करा; मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक

आदित्य ठाकरेंना अटक करा; मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक

शिवसेना प्रवक्ते किरण पावसकरांची फडणवीसांकडे मागणी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाऊस आल्याचे स्वागत करा तक्रार काय करता या विधानावर आदित्य ठाकरे यांनी शेलक्या भाषेक टीका केली होती. या टीकेचा समाचार शिंदे गटातील किरण पावसकर यांनी घेतला आहे. आदित्य ठाकरे बाल बुद्धी नाहीये तर मंद बुद्धी आहे, अशा शब्दांत पावसकर यांनी आदित्य ठाकरेंवर हल्ला चढविला आहे.

आदित्य ठाकरेंना अटक करा; मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक
शिंदेंवर आदित्य ठाकरेंकडून शेलक्या भाषेत टीका; म्हणाले, मी आतापर्यंत इतका...

शेतकरी आणि कष्टकऱ्यासाठी ही गोष्ट चांगली आहे की पहिला पाऊस पडला. मरीन ड्राईव्ह ला जाऊन बघा लोक एन्जॉय करत आहेत. आदित्य ठाकरे बाल बुद्धी नाहीये तर मंद बुद्धी आहे. मुख्यमंत्र्यांनी पाऊस पडल्यावर स्वागत करा असं म्हटलं आणि पाऊस पडला नसता तर आदित्य ठाकरेंनी म्हंटले असते की शिंदे सरकार आहे म्हणून पाऊस पडला नाही. आणि आता पाऊस पडला तर वाट्टेल ते बोलतात, अशी जोरदार टीका किरण पावसकर यांनी केली आहे.

आज पाऊस पडला तर मुंबईचे पालक मंत्री बीएमसी वार रूम मध्ये जाऊन आले. हे जे काही ६०८ कोटींचा घोटाळा सांगता आहेत ते निव्वळ खोटं आहे. आताची की काही प्रेस कॉन्फ्रेंस होती ती पोटदुखी होती. ज्या बीएमसी आणि कॉन्ट्रक्टरवर घोटाळ्याचे आरोप करत आहात लक्षात ठेवा या बीएमसीमधून झालेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून तुमच्या बालपणीचा खर्च केला आहे, असाही निशाणा त्यांनी साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सण साजरे करत फिरत आहे असा आरोप करतात मग करायचा नाही का सणवार साजरे? कोविड काळात सणवार साजरे करता नाही आले.. मंदिर बंद होते मग आता करायचे नाहीत का?? माझ्या वडिलांना मुख्यमंत्री बनवा हा एवढा एकच एजेंडा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जनतेमध्ये जात आहेत. मंत्रालयात येतात आणि त्याचाच ह्यांना त्रास होतो. स्वतःच्या वडिलांना कधी मंत्रालयात येताना पाहिले आहे काय?

बाळासाहेबांचा विचार घेऊन एक कष्टकरी वर्गातील व्यक्ती महाराष्ट्राचा सीएम होतो म्हणून तुमचा जळफळाट होतो म्हणून तुम्ही वाट्टेल ते मुख्यमंत्र्यांना बोलतात? आदित्य ठाकरेंनी संवैधानिक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला शिव्या दिल्या आहेत. आदित्य ठाकरेंवर सुमोटो केस करून कारवाई करा. असभ्य वक्तव्यामुळे आदित्य यांना अटक करा, अशी मागणी पावसकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com