शिवसेनेच्या महिला शहर प्रमुखावर चाकू हल्ला; तीन आरोपी अटकेत

शिवसेनेच्या महिला शहर प्रमुखावर चाकू हल्ला; तीन आरोपी अटकेत

शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्याच भाचा नितीन कावरखे याला अटक करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

गोपी व्यास | वाशिम : शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर अज्ञाताकडून जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना 10 नोव्हेंबर रोजी घडली होती. यामुळे जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला होता. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्याच भाचा नितीन कावरखे याला अटक करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

शिवसेनेच्या महिला शहर प्रमुखावर चाकू हल्ला; तीन आरोपी अटकेत
इतिहासाचे पुनर्लेखन करणार : अमित शहा

शिवसेना महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर अज्ञाताकडून जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला होता. 10 नोव्हेंबर रोजी दिवसा ढवळ्या ही घटना घडली होती. आतापर्यंत या प्रकरणी तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांचाच भाचा नितीन कावरखे याला अटक करण्यात आली आहे. आता मात्र संशयाची सुई सुरेश मापारी यांच्यावर आली आहे. पोलीस तपासासाठी सुरेश मापारी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्यांनी प्रकृती अस्वस्थतेचे कारण दिले व अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या परवानगीने किंवा प्रकृती बरी झाल्यानंतर संशयित आरोपी सुरेश मापारी यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com