शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर ठाकरेंनी दिलेला शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी पाळला

शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर ठाकरेंनी दिलेला शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी पाळला

ठाकरेंनी दिलेला शब्द हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाळला म्हणून राजकीय चर्चा होतच आहे. परंतु, सामाजिक स्तरातून त्याचे कौतुक देखील केले जात आहे

विकास माने | बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी बीडमधील शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी 2021 मध्ये तिरुपती बालाजी साठी पायी यात्रा काढली होती. परंतु, या दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशातच रुईकर कुटुंब उघड्यावर पडणार नाही, असा शब्द ठाकरेंकडून देण्यात आला. मात्र, त्यावेळी ठाकरेंनी दिलेला शब्द आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केलाय.

शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर ठाकरेंनी दिलेला शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी पाळला
शरद पवारांना अजित पवार कन्फ्युज करतात, म्हणून...; विखे-पाटलांचा टोला

तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि येणाऱ्या काळातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावा, असा नवस या कडवट शिवसैनिकाने केला होता. बीड ते तिरुपती बालाजी असा पायी जाण्याचा संकल्प केला आणि त्याच दिशेने प्रवास सुरू होता. मात्र, कर्नाटकपर्यंत पोहोचतात. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी मृत्यूनंतर संपूर्ण रुईकर कुटुंब उघड्यावर आले. घरातील पत्नी, मुलगी, मुलगा आणि वयोवृद्ध वडील रुईकरांवर अवलंबून होता. अशातच उद्धव ठाकरेंनी रुईकर कुटुंबांना आधार दिला. परंतु, शिवसेना फुटी नंतर रुईकर कुटुंबाकडे शिवसेनेचे दुर्लक्ष झालं. अशातच ठाकरेंचा शब्द हा शिंदेंच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पूर्ण केला.

दीड वर्षानंतर आज रुईकरांचं टोलेजंग घर बीड शहरातील बोबडेश्वर परिसरात पूर्ण झालं. आणि याचंच लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. दोन बेडरूम हॉल किचन असं हे घर असून यात सर्व साहित्य रुईकरांच्या कुटुंबियांना देण्यात आले. मात्र या घराच्या लोकार्पणावेळी रुईकरांच्या पत्नीने उद्धव ठाकरें विषयी खंत बोलून दाखवली. ठाकरेंसाठी जीव गेला मात्र त्यांच्याकडून नंतर कोणतीही विचारपूस झाली नाही. यांचं खूप वाईट वाटतं पतीच दुर्दैवी निधन हे वाया गेलं असल्याचं रुईकरांच्या पत्नीने म्हटलं आहे. दरम्यान, आता या निमित्ताने ठाकरेंनी दिलेला शब्द हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाळला म्हणून राजकीय चर्चा होतच आहे. परंतु, सामाजिक स्तरातून त्याचे कौतुक देखील केले जात आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com