Rahul Narvekar
Rahul NarvekarTeam Lokshahi

16 आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचे विधान; म्हणाले, जे नियम आहेत त्यानुसार कारवाई...

अशा सगळ्या बाबींसंदर्भातला अधिकार हा केवळ आणि केवळ विधानसभा अध्यक्षांकडे असतो.
Published by :
Sagar Pradhan

राज्यातील राजकारणात सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना त्यातच दुसरीकडे सर्वांचे लक्ष महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे लागले आहे. तो निकाल आता कोणत्याही क्षणी येऊ शकतो. त्यातच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. त्यावरच राहुल नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेत यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. अपात्रतेचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असल्याने माझ्या लंडन दौऱ्याचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही नसल्याचा नार्वेकर यांनी खुलासा केला आहे.

Rahul Narvekar
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

काय केला नार्वेकरांनी खुलासा?

16 आमदार अपात्रतेचा विषय, त्यानंतर काही आणखी आमदारांवरही अपात्रतेचा मुद्दा आहे. याबाबत सर्वांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामध्ये काहींनी मुदत वाढवून मागितली आहे. विधानसभेचे जे नियम आहेत त्यानुसार कारवाई केली जाईल. आपल्या संविधानाची तरतूद आहे, की ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्यालय रिक्त असतं, त्यावेळेला त्या कार्यालयाचे अधिकार हे उपाध्यक्षांकडे असतात आणि ज्या ठिकाणी अध्यक्ष कार्यालयात उपस्थित असतात किंवा आपल्या चार्ज घेतात त्यावेळी त्यांच्याकडे अध्यक्षांचे कोणतेही अधिकार राहत नाही. अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, जेव्हा अध्यक्ष विधानसभेत उपस्थित असतात कार्यरत असतात त्यावेळेला अशा सगळ्या बाबींसंदर्भातला अधिकार हा केवळ आणि केवळ विधानसभा अध्यक्षांकडे असतो. आपल्या देशातल्या सर्व कायद्याचा अभ्यास केला तर एकदा पुढे आले की मागे जाता येत नाही. त्यामुळे पुढे निर्णय काय येतो त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com