राजकारण
Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित आता लवकरच लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात?
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार निवडणुकीच्या मैदानात उतरत असतात.
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार निवडणुकीच्या मैदानात उतरत असतात. आता एका नवीन चर्चेला उधाण आलंय ते म्हणजे सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने आता लवकरच निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपतर्फे माधुरीला तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी माधुरीला तिकीट दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.