विरोधक विधान भवनाच्या पायरीवर, पण शरद पवार यांचा गट गायब

विरोधक विधान भवनाच्या पायरीवर, पण शरद पवार यांचा गट गायब

आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरवात झाली आहे.

खोक्यावर खोके, एक दम ओके, खोके सरकार हाय हाय...,घटना बाह्य सरकार हाय हाय ..., अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहेत. काँग्रेसच्या आणि ठाकरेंच्या या आंदोलनात शरद पवारांसोबतचा एकही आमदार नाही आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार यावेळी उपस्थित होते. मात्र शरद पवार यांच्या गटाचा एकही आमदार पायऱ्यावर उपस्थित नव्हता. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com