Jitendra Awhad
Jitendra Awhad Team Lokshahi

कन्नडिगे अस्मितेला हातभार लावण्याचं काम महाराष्ट्र सरकार करतय, आव्हाडांची जोरदार टीका

तिथे मराठी बातमी माणसाच्या कानफाडीत बसली असून, २८८ आमदारांच्याही ही कानफाडात मारली आहे.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. याच गोंधळा दरम्यान, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या मुद्द्यावरून सध्या प्रचंड राजकारण तापलेले आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहे. विधिमंडळच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

Jitendra Awhad
दिल्लीवारीवर केलेल्या उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, बोलणारांनी आधी...

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

सीमाभागाच्या प्रश्नाबाबत सरकारने सात-आठ दिवस झालं एकही शब्द काढण्यात आला नाही. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, याबाबत बोम्मईंनी एक दिवसात ठराव केला. आपलं सरकार उद्या ठराव घेऊ म्हणत आहे. मात्र, तिथे मराठी बातमी माणसाच्या कानफाडीत बसली असून, २८८ आमदारांच्याही ही कानफाडात मारली आहे. सीमावर्ती भागातील लोकांसाठी आम्ही काहीच करु शकलो नाही, त्यामुळे त्यांची माफी मागितली पाहिजे. कर्नाटक अन्याय करताना आम्ही षंढासारखे बगत राहिलो. आम्ही इथे लढायला पाहिजे होतं,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री नसल्याने ठराव मांडला नाही. पण, ठराव मांडला असता तर ही माहिती कर्नाटकला मिळाली असती. मात्र, कर्नाटकात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा हरली आहे. त्यामुळे कन्नडिगे अस्मितेला हातभार लावण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे. विधानसभा संपताना ठराव मांडायचा. एकदा विधानसभा संपली की त्यावर चर्चा होणार नाही,” असा आरोप त्यांनी यावेळी शिंदे फडणवीस सरकारवर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com