राजकारण
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांना व्हीप, अनिल पाटील म्हणाले….
आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून एकमेकांना व्हीप लागू केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीत संघर्ष होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद व मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे सगळ्या आमदारांना व्हीप बजावले जातील. जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी व्हीप नाकारला तर त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आमच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्हीप बजावण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. असे अनिल पाटील म्हणाले.