Uday Samant
Uday SamantTeam Lokshahi

ठाकरे गटातील 12 ते 13 आमदार मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात - उदय सामंत

शिवसेनेच्या संस्थापकांपैकी एक खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे भाकीत वर्तवल्यानंतर आता सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहे. मात्र, शिंदे गटानेच नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. आमच्याकडे 170 आमदारांचं संख्याबळ आहे. ठाकरे गटातील अजून 12 ते 13 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

Uday Samant
भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर चौघेच दिसतील, बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

काय म्हणाले उदय सामंत?

ठाकर हे गटातील 12 ते 13 आमदार आमच्या संपर्कात असल्याने ही संख्या 182 वर जाणार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांचा प्रश्नच येत नाही. निवडणुका वेळेवरच होतील, आपल्याकडील आमदार टिकून राहावेत म्हणून अशी विधाने केली जात आहे. आमच्याकडे 170 आमदारांचं संख्याबळ आहे. ठाकरे गटातील अजून 12 ते 13 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेच्या संस्थापकांपैकी एक खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठीच त्यांनी बेताल विधानं करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असं ते यावेळी म्हणाले. अमोल कीर्तिकर तिकडे राहिले आणि गजानन कीर्तिकर इकडे आले या कौटुंबिक गोष्टीवर मला बोलायचं नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, गजानन कीर्तिकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com