आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालं. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली.
आता विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांकडून नीट उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. आता विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.