नव्या वर्षातही तारीखच! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नव्या वर्षातही तारीखच! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर नववर्षात आज पहिलीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर नववर्षात आज पहिलीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. पाच सदस्यीय घटनापीठाकडून ही सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने तारीख दिली असून पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.14 फेब्रुवारीपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सलग सुनावणी होणार आहे.

नव्या वर्षातही तारीखच! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
१६ आमदारांना अपात्र ठरवलं गेलं तर काय होईल? कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी मांडले मत

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे यासंदर्भातील याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेने पाच ऐवजी सात सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती केली होती. परंतु, न्यायालयाने ही सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, ठाकरे गटाची मागणीवर कोणताही निर्णय दिलेला नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com