'काही लोकांची इच्छा हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये' मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र
महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आज मुंबई नुकताच मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन होत असून आजच्या लोकर्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याचे दिसून आले. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बीकेसी येथील भाषणात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागच्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये गेमचेंजर अशा समृद्धी महामार्गाचे लोकर्पण मोदी साहेबांच्याहस्ते राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे झाले. आज वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राज्याच्या राजधानीत एक अभुतपूर्व सोहळा संपन्न होतो आहे.ज्या कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींनी केलं, त्याचं उद्घटानही त्यांच्याच हस्ते होत आहे. काही लोकांची इच्छा होती की, हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये. पण नियतीसमोर कुणाचही चालत नाही. आमची इच्छा होती, महाराष्ट्र आणि मुंबईकरांची इच्छा होती. म्हणूनच लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येथे उपस्थित आहेत. असा निशाणा एकनाथ शिंदे त्यांनी विरोधकांवर साधला.
मविआ सरकारच्या काळात राज्याचा किती विकास झाला? हे सर्वांनाच माहीत आहे. ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी, लोकोपयोगी कामांना गती देण्यासाठी आणि ट्राफिकमध्ये गुदमरलेल्या मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळेच मिळाली. तुमचा आशिर्वाद राहिला तर मुंबईच्या विकासाचा वेग वाढेल. आणि पुढील दोन वर्षात. असे म्हणताच देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. व मुख्यमंत्र्यांनी भाषण थांबवले. यामुळे पुन्हा एकदा विरोधक शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची संधी मिळाली आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे जिव्हाळ्यांचे नाते होते. हे मला सांगायची गरज नाही. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान हा या दोघांच्याही विचारांचा समान धागा होता. आणि विकासाचे राजकारण हा पाया होता. तेच सुत्र धरुन महत्वकांक्षी प्रकल्पाचे पुर्ण करण्यासाठी पंतप्रधान मुंबई मी आमंत्रित केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
पुढे ते म्हणाले की, आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा आहे. राज्यात आज सर्वसामान्यांचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचं नातं होतं. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांचं दुकान लवकरच बंद होईल, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर केली.