लोकसभेसाठी मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात; सूत्रांची माहिती

लोकसभेसाठी मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात; सूत्रांची माहिती

लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. एकूण 48 पैकी 44 जागांवर बोलणी पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. एकूण 48 पैकी 44 जागांवर बोलणी पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. 48 पैकी 2 जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

लोकसभेसाठी मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात; सूत्रांची माहिती
रामदास कदम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; कीर्तीकरांसोबतच्या वादावर तोडगा निघणार?

लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून एकूण 48 पैकी 44 जागांवर बोलणी पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गट 19 ते 21 जागांवर, काँग्रेस 13 ते 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 ते 11 लढण्याची शक्यता आहे. यासोबतच 48 पैकी चार जागांवर अद्याप बोलणी झालेली नाही. या 4 जागांवर तीनही पक्ष चर्चेतून मार्ग काढणार असल्याचे समजत आहे.

अकोला आणि हातकणंगले या दोन लोकसभेच्या जागा अद्याप राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकरांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. अकोल्यासाठी प्रकाश आंबेडकर हे सोबत न आल्यास ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. तर, हातकणंगलेसाठी राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत नाही आले तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. भंडारा गोंदिया, अमरावती या जागेवर अद्याप चर्चा चालू आहे मात्र मार्ग निघेल, अशीही माहिती मिळत आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षातील नेते पाच राज्यातील निवडणुकांमध्ये व्यस्त असल्यामुळे याबाबत अद्याप काँग्रेस पक्षाकडून कुठलाही स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांकडून ही माहिती समोर येताना दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com