सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांचे निधन

सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांचे निधन

सुपरस्टार महेश बाबू यांचे वडील आणि ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कृष्णा यांचे निधन झाले. आज पहाटे ४ वाजता हैदराबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला

हैदराबाद : सुपरस्टार महेश बाबू यांचे वडील आणि ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कृष्णा यांचे निधन झाले. आज पहाटे ४ वाजता हैदराबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतेच त्यांना हृदयविकाराचा झटका आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कृष्णा यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे सोमवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा (80) यांना रविवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने 1.15 च्या सुमारास रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले. त्यांना उपचार आणि देखरेखीसाठी अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते. परंतु, आज सकाळी 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

कृष्णा यांचे खरे नाव घटामनेनी शिवराम कृष्णा आहे आणि ते तेलुगू चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेते होते. कृष्णा यांनी 1960 च्या दशकात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि सुमारे 350 चित्रपटांमध्ये काम केले. ते एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माताही होता. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृष्णा हे टीडीपी नेते जय गल्ला यांचे सासरेही होते. १९८० च्या दशकात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते खासदार झाले. मात्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारण सोडले. दरण्यान, त्यांची पत्नी आणि महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे या वर्षी सप्टेंबरमध्ये निधन झाले होते. त्यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांचे जानेवारीत निधन झाले. त्यांची दुसरी पत्नी, अभिनेत्री विजया निर्मला यांचे 2019 मध्ये निधन झाले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com