माझ्यामागे एकनाथ अन् देवेंद्र यांची ताकद, त्यामुळे कोणाला घाबरत नाय : महेश शिंदे

माझ्यामागे एकनाथ अन् देवेंद्र यांची ताकद, त्यामुळे कोणाला घाबरत नाय : महेश शिंदे

महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी गटाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींवर विजय मिळवला

प्रशांत जगताप | सातारा : साताऱ्यात सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. शिंदे गटाच्या आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी गटाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद आहे. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाय, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खेड ग्रामपंचायतीमध्ये 18 पैकी 6 जागा आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलला मिळाल्या असून आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाला 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. खेड ग्रामपंचायत ही आमदार महेश शिंदे गटाच्या ताब्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींवर महेश शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.

खेड ग्रामपंचायतीमध्ये मला पाडण्यासाठी 3 आमदार आणि आणि 2 खासदार यांची ताकद लावली होती. पण, माझ्या मागे एकनाथ आणि देवेंद्र यांची ताकद आहे. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाय, असे महेश शिंदे यांनी सांगत दुष्ट शक्तींचा पराभव होणारच आहे, असे सांगितले आहे.

दरम्यान, साताऱ्यात ग्रामपंचायतींचे निकाल हाती येऊ लागले असून खेड ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. यामध्ये खेड, संभाजीनगर, उपळी, खिंडवाडी, गोजेगाव आणि चिंचणेर संमत निंब या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांसह सातारा शहरातून गुलालाची उधळण करत वाजतगाजत मिरवणूक काढली.

Lokshahi
www.lokshahi.com