'मुख्यमंत्री शिंदेंना राष्ट्रवादीची धास्ती'

'मुख्यमंत्री शिंदेंना राष्ट्रवादीची धास्ती'

एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीवर टीका; महेश तपासे यांचे प्रत्युत्तर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रवादीत दोन गट असल्याचा टोला लगावला होता. याला राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असावा म्हणूनच असे पोरकट विधान त्यांनी केले, असा थेट हल्लाबोल महेश तपासे यांनी केला.

'मुख्यमंत्री शिंदेंना राष्ट्रवादीची धास्ती'
प्रकाश आंबेडकर नेहमीच कॉंग्रेसला ब्लॅकमेल करतात; पटोलेंचा गंभीर आरोप

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेतून मार्च 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारक व शौर्य पुरस्कार याबाबत त्यांची भूमिका मांडली व एकंदरीतच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवार यांना किती आदर आहे व कृतीतून ते व्यक्त करण्याचा कसा प्रयत्न त्यांनी केला या सर्व गोष्टी समोर आल्या. अजितदादांच्या बदनामीचा कट रचणारे आज उघडे पडून निरुत्तर झाले. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदीवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करण्याचे टाळले आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत, असा हास्यस्पद दावा त्यांनी केला, असेही महेश तपासे यांनी म्हंटले आहे.

'मुख्यमंत्री शिंदेंना राष्ट्रवादीची धास्ती'
'बलात्काराचे आरोप असणाऱ्यांसोबत बसतात, तेव्हा चित्रा वाघ काय गांधारी होतात का?'

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा. ज्यांना म्हणायचं असेल त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणा, असं शरद पवार म्हणाले होते. यावरुन त्यांच्या पक्षात अजित पवार आणि शरद पवार गट आहेत, म्हणून ते बोलत आहेत. धर्मवीर पदी संभाजी राजे यांना वर्षानुवर्ष आहे. अजित पवारांनी माफी मागावी, त्यांना पण तोच नियम लागू होईल, अशी मागणीही एकनाथ शिंदे यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com