दुधावरून राजकारण तापणार! पुण्यातील कात्रज डेअरीमध्ये गैरव्यवहार?

दुधावरून राजकारण तापणार! पुण्यातील कात्रज डेअरीमध्ये गैरव्यवहार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता असलेल्या पुणे दूध उत्पादक संघ म्हणजेच पुण्यातील कात्रज डेअरीत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वपूर्ण आदेश दिले

अमोल धर्माधिकारी | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता असलेल्या पुणे दूध उत्पादक संघ म्हणजेच पुण्यातील कात्रज डेअरीत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. म्हशींच्या दुधाची फॅट वाढ करण्याच्या गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता हे प्रकरण दुग्ध विकास मंत्र्यांकडे गेले आहे.

दुधावरून राजकारण तापणार! पुण्यातील कात्रज डेअरीमध्ये गैरव्यवहार?
'गुजरातसाठी उद्योग पळवले, कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जिल्हे...'

गेल्या महिन्यात या प्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. याबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. धर्मंद्र खांडरे यांनी राधाकृष्ण पाटलांकडे तक्रार केली होती. विद्यमान संचालकांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप खांडरे यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, असे आदेश दिले आहेत.

तर, दुसऱ्या बाजूला, आमच्या डेअरीमध्ये कुठलीही अनियमितता किंवा भ्रष्टाचार झालेला नाही. आम्हाला आत्तापर्यंत कुठलीही तक्रार लेखी स्वरूपात आली नसून जर कुठली तक्रार आली तर त्याला आम्ही उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया कात्रज डेरीच्या चेअरमन केशर पवार यांनी दिली आहे.

दुधावरून राजकारण तापणार! पुण्यातील कात्रज डेअरीमध्ये गैरव्यवहार?
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांना जामीन मंजूर

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अनेक विषयांवरून खडाजंगी होतानाच आपल्याला दिसले आहे. मात्र, आता दुधावरून नवीन राजकारण तापणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com