ममता बॅनर्जींचे प. बंगालमध्ये 'एकला चलो रे'; केली ‘ही‘ मोठी घोषणा

ममता बॅनर्जींचे प. बंगालमध्ये 'एकला चलो रे'; केली ‘ही‘ मोठी घोषणा

इंडिया आघाडीला मोठा धक्का
Published by :
Siddhi Naringrekar

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जीं यांनी केली आहे.

"काँग्रेस पक्षाशी माझी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल, याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे. पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही." असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com