VIDEO: ममता बॅनर्जींनी दाखवले भाजपचे वॉशिंग मशीन; काळे कपडे आत टाकले आणि...

VIDEO: ममता बॅनर्जींनी दाखवले भाजपचे वॉशिंग मशीन; काळे कपडे आत टाकले आणि...

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी नव्या पद्धतीने केंद्र सरकारचा निषेध केला.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी नव्या पद्धतीने केंद्र सरकारचा निषेध केला. कोलकाता येथे आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात त्यांनी मंचावर ‘भाजप वॉशिंग मशीन’ दाखवले. या वॉशिंग मशिनच्या माध्यमातून ममता यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांच्या निर्दोष सुटकेचा खरपूस समाचार घेतला आहे. तृणमूल काँग्रेसने या वॉशिंग मशीनचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर जारी केला आहे.

VIDEO: ममता बॅनर्जींनी दाखवले भाजपचे वॉशिंग मशीन; काळे कपडे आत टाकले आणि...
आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा, आणखी एक सुशांत सिंह राजपूत...

या व्हिडीओमध्ये व्हिडिओमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मशीनमध्ये काळे कपडे घालताना दिसत आहेत. यानंतर तो मशिनमधून पांढरे कपडे काढताना दिसतो. यादरम्यान भाजप वॉशिंग मशीन....भाजप वॉशिंग मशीन... तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

घरगुती गॅसच्या वाढत्या किमती, राज्य सरकारचा निधी न वाटणे आणि केंद्रीय संस्थांचा गैरवापर याविरोधात तृणमूल काँग्रेसने आज धरणे आंदोलन केले. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्य, केंद्रीय एजन्सी विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देत आहेत. पण, भाजपमध्ये दाखल झालेल्या एकाही नेत्याची चौकशी सुरू करत नाहीत. भाजप वॉशिंग मशीन बनले आहे. मला सर्व चोर आणि लुटारूंची यादी द्या, असेही त्यांनी म्हंटले आहे. मला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. गरज पडल्यास मी पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलनालाही बसू शकते, असेही बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप आमदार रमेश पाटील यांनी आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते, असे म्हंटले होते. खरं म्हणजे आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ते गुजरातहून येतं. त्यामुळे आम्ही साफसफाई करुन जो माणूस आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे, असे रमेश पाटील म्हणाले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com